नगर : काँग्रेसमध्ये एकनिष्ठतेने आमदार बाळासाहेब थोरात यांनी काम केलेले आहे. राज्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार आहे. काँग्रेस गटास सर्वाधिक जागा मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपावर कॉंग्रेसच दावा करणार असून मुख्यमंत्री म्हणून थोरात होणार आहेत.
गेल्या दोन-तीन महिन्यापासूनच विविध भागात आमदार बाळासाहेब थोरात यांचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. या फ्लेक्सवर भावी मुख्यमंत्री असाच उल्लेख करण्यात आलेला आहे. नगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात हे फ्लेक्स झळकलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात हे आगामी काळात होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरू झालेली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून थोरात हे कॉंग्रेसमध्ये आहेत. मध्यंतरीच्या काळात अनेकांनी कॉंग्रेसची साथ सोडलेली आहे. ते पुन्हा कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने पक्षात येण्याच्या हालचाली करीत आहेत. परंतु त्यांना अपयश येत आहे.
कॉंग्रेस पक्ष अडचणीत असताना मात्र थोरात हे पक्षात राहिलेले असून जिल्ह्यासह राज्यात त्यांनी पक्ष बांधणीचे काम चांगले केलेले आहे. त्यांच्या या कामाचे फळ त्यांना निश्चितच मिळेल अशी आशा कार्यकर्त्यांना लागलेली आहे.
थोरात मुख्यमंत्री होणार असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतापासून प्रचाराला सुरवात केलेली असून कॉंग्रेसच्या उमेदवारांबरोबरच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी केला आहे.
यासर्व बाबींमुळे विरोधक संगमनेरमध्ये येऊन निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांना स्थानिक पातळीवर मोठा विरोध असतानाही काहीजण आपण निवडणूक लढविणार असल्याचे म्हणत आहे. त्यावर सर्वजण नाराजी व्यक्त करीत आहे. त्यांच्या याकृतीने थोरात यांचे वर्चस्व वाढत चालले आहे.
.jpeg)
Post a Comment