त्या कार्यक्रमाला गर्दीच नाही

नगर : जिल्ह्यातील एका पक्षाच्या कार्यक्रमाला गर्दी कमी असल्याचे दिसून आले आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे त्या नेत्याला आता पक्ष उमेदवारी देणार की पर्यायी उमेदवार पाहिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


जिल्ह्यात एका पक्षाकडून कार्यक्रम घेतले जात आहे. एका भावी आमदाराला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाईल अशी जाहीर केलेले आहे. त्यामुळे त्या नेत्यांनी आता निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. 

पक्षाचा कार्यक्रम होणार असल्याने त्याने त्याने जोरदार मोर्चे बांधणी केली.  पक्षाच्या कार्यक्रमाला मात्र त्या नेत्याला गर्दी जमवता आली नाही.  त्यामुळे त्या नेत्याचे भवितव्य अंधारमय  असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. 

त्या कार्यक्रमानंतर कार्यक्रमातील मोकळ्या खुर्च्यांची जोरदार चर्चा सुरु होती.  आताच जर या भावी आमदाराला जनमत नाही तर आगामी काळात कसं होणार असा सवाल केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post