नेवासे ः घोडेगाव उपबाजार समितीत कांद्याचे बुधवार (ता. 11) लिलाव झाले आहे. कांद्याला सर्वाधिक 4200 रुपयांचा भाव प्रतिक्विंटलमध्ये मिळाला आहे.
नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजार समितीच्या आवारात नेवासे तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्या्चया 35346 गोण्यांची आवक झाली. 198 वाहनातून कांदा शेतकऱ्यांनी विक्रीस आणला होता. यामध्ये कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एख नंबर कांदा ः 4100 ते 4200, दोन नंबर कांदा ः 3800 ते 3900, तीन नंबर कांदा ः 3700 चे 3800, गोल्टी कांदा ः 3200 ते 3400, गोल्टा ः 3500 ते 3800, जोड कांदा ः 1000 ते 3200.

Post a Comment