संदीप कोतकरांच्या एन्ट्रीने राजकीय वातावरण तापले...

नगर - शहरातील राजकारणाने आता चांगलीच कलाटणी घेतलेली आहे. सध्या शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची इच्छुकांनी आता काही झाले तरी निवडणूक लढविण्याचा निश्चय केलेल ाआहे. या सर्व बाबी फक्त संदीप कोतकर यांची पुन्हा राजकारणात एन्ट्री होत असल्याचे संकेत मिळाल्याने झालेले आहे. आगामी काळात कोण विधानसभेसाठी उमेदवारी करणार हे स्पष्ट होणार असले तरी शहरात मात्र राजकीय खल सुरु झालेला आहे.


अहमदनगर शहराची ओळख एक मोठे खेडे म्हणून आहे, असे अनेकजण म्हणत आहेत. सध्या विरोधकही सत्ताधारी आमदारांवर विकास झाला नसल्याने टीका करीत आहेत. नगर शहराचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर संदीप कोतकर यांच्या सारखाच दूरदृष्टीच्या नेत्याची नगर शहराला गरज आहे. संदीप कोतकर यांनी महापौर काळात अनेक विकास कामे केलेली आहेत. या कामांमुळे केडगावसह नगर शहरात अनेक कामे झालेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विकास कामे करणारा नेता म्हणून पाहिले जात आहे.

शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवात जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांनी मंडळांच्या माध्यमातून मतांची पेरणी केलेली आहे. आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी महायुतीकडून निश्चित मानली जात आहे. शहरात अनेक ठिकाणी फलक उभारलेले दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ते उभे राहतील, असे संकेत सध्या तरी दिसून येत आहे. आगामी राजकीय घडामोडीत काय होते, हे  येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर शहरात महाविकास आघाडीकडून कोण लढणार या विषयी सध्या वेगवेगळ्या नावांचीच चर्चा सध्या सुरु आहे. यामध्ये आता माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव पुढे आलेले आहे. तेच या मतदारसंघात संग्राम जगताप यांना चांगली फाईट देतील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु झालेल्या असून आगामी काळात काय राजकीय रणनिती होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

कोतकर हे गणेश विसर्जन मिवरणुकीत सहभागी झालेले आहे. त्यांनी कोणतेही टीका-टिपन्नी व आपण निवडणुकीला उभे राहणार याची वक्तव्य केलेले नाही. परंतु त्यांच्या नुसत्या नगर शहरातील प्रवेशाने त्याच्या राजकीय विरोधकांना धडकी भरलेली आहे. त्यामुले या वेळी विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post