नगर ः श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. या मतदारसंघातून भाजप नेत्या सुवर्णा पाचपुते यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.लोकसभा निवडणुकीचा उडालेला धुऱाळा बसत नाही तोच आता
आगामी विधानसभा निवडणुकीचा धुराळा श्रीगोंद्यात उठण्यास सुरवात झालेली आहे. सध्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार कोण असणार अशी चर्चा सध्या सुरु झालेली आहे. यामध्ये महायुतीकडून प्रतिभा पाचपुते, अनुराधा नागवडे, सुवर्णा पाचपुते यांची नावे चर्चेत येत आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा सुरु असून पक्षाचे वरिष्ठ नेते फक्त बघ्याचीच भूमिका घेत आहेत.
लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला लीड कमी भेटलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्वाधिक लीड मिळून विजय मिळणे शक्य झालेले आहे. त्याची राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरु आहे. महायुतीच्या नेत्यांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेतला असला तरी तो दाखविण्यापुरताच राहिला होता. प्रत्येकाने आपली आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन बाजुलाच राहणे पसंत केले.
सध्या आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबातील कोण उभे राहणार किंवा अनुराधा नागवडे यांना उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. परंतु या दोन्ही उमेदवारांपेक्षा सर्वसामान्य कुटुंबातील प्रतिभा पाचपुते यांना पक्षाने संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. या दोन्ही कुटुंबाच्या वादात पक्षाची हाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून सुवर्णा पाचपुते याच उमेदवार ठेवल्या तर सर्वच कार्यकर्ते एक होऊ काम करतील. त्यामुळे पक्षाची एक जागा वाढण्यास मदत होणार आहे.
याबाबत तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांचे एकशिष्टमंडळ लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीत त्यांच्या उमेदवारी बाबत चर्चा केली जाणर असल्याचे भाजप कार्यकर्ते बोलत आहे. सध्या उमेदवारीवरून वाद होण्यापेक्षा आपण सर्वसामान्य घरातील व्यक्तीला उमेदवारी देऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाणार आहे.
Post a Comment