नगर ः विधानसभा निवडणुकीच धामधूम सध्या सुरु झालेली आहे. निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. काही नेत्यांनी महिलांसाठी स्पर्धा भरविलेल्या आहे. या स्पर्धांमध्ये विजेत्यांना बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत. परंतु या बक्षीसावरूनच आता नाराजी वाढत चालली आहे. बक्षीसे 15 सहभागी महिला 300 यामुळे लोक खुश होणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने महिला नाराज होत आहेत. त्यामुळे स्पर्धेचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला फायदा होईल, अशी अपेक्षा सरकारला आहे. तसा प्रचारही आता सरकारमधील पक्षाच्या नेत्यांनी सुरु केलेला आहे. महिला मतदारांच्या मदनासाठी सरकारने ही योजना सुरु केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
सरकारकडून हे प्रयत्न झालेले असले तरी सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मतदारांच्या चर्चेत राहण्यासाठी आता मतदारसंघात विविध स्पर्धा आयोजित करण्यास सुरवात केलेली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून ते महिला मतदारांना आकर्षित करून मतदान मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.
नेत्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध भागात टप्प्या टप्प्याने विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. प्रत्येक भागातील स्पर्धेतील बक्षीसांवर दोन ते तीन लाखाचा खर्च करण्यात आलेला आहे. बक्षीसासह जेवणावळी मंडप, खुर्ची आदीचा एक कार्यक्रम पंधरा लाखाच्या घरात जात आहे. एव्हढा मोठा खर्च करूनही नागरिकांकडून साथ मिळण्याऐवजी आता नाराजी व्यक्त केली जात आहे.
एका एका भागात महिलांची संख्या 400 ते 500 च्या घरात आहेत. स्पर्धांमध्ये सहभाग घेणार्या महिलांची संख्या 300 ते 350च्या आसपास आहे. तसेच जेवणावळीवर पाच लाखाचा खर्च केलेला आहे. या खर्चाच्या माध्यमातून ते मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यांचे प्रयत्न चांगले असले तरी त्यांच्याकडून मात्र मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहेत. एका भागातील कार्यक्रमावर त्यांना पंधरा लाखाचा खर्च अपेक्षीत आहे. मात्र नेत्यांनी प्रसिध्दीवर मोठा खर्च केलेला आहे.
हा प्रसिध्दीचा खर्च काही दिवसांचा असून कार्यक्रम झाल्यानंतर चौका-चौकातील फलक गायब होत असून त्या जागेवर आता विरोधकांचे फलक लागलेले दिसून येत आहे. त्यामुळे पंधरा लाखाचा खर्च एक-एक भागात करूनही मताला त्याचा फायदा होईल की नाही, हे मात्र गुलदस्त्यात आहे.
स्पर्धेत विजेते होणाऱ्यांचे मतदानही आपल्या मतदारसंघात नसल्याच्या काही बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील त्या नेत्याचा स्पर्धांवरील खर्च पाण्यात गेल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. या स्पर्धांचा फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होत आहे. ही स्पर्धा सुरु करायला लावून दुसऱ्यानेच आपले घर भरून घेतले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुुरु आहे.

Post a Comment