नगर ः कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहेत. या मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस व भाजप या दोनच पक्षात लढत होणार आहे. ही लढत चुरशीची होणार असल्याचे आतापासून स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाकडून ही जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सध्या या मतदारसंघात फोडातोडीच्या राजकारणाला वेग आलेला आहे.
मागील विधान सभा निवडणुकीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते नामदेव राऊत यांना राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये घेऊन पक्षाने आपली ताकद वाढविली होती. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढलेली आहे. राळेभात यांच्यासह छोटे-मोठे कार्यकर्तेही आता भाजपमध्ये दाखल होऊ लागलेले आहेत.
तशीची परिस्थिती शरदचंद्र पवार गटातही दिसून येत आहे. या गटात सध्या भाजपमधील नाराज मंडळी दाखल होत आहे. एकमेकांचे नाराज कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात जात आहेत. आगामी काळात तेही आपल्याकडेच येतील अशी आशा सर्वांच असल्यामुळे एकमेकांवर स्थानिक पातळीवर टीका-टिपन्नी करण्यास आता सर्वांनीच विरोध केलेला आहे.
जामखेडमधील शरदचंद्र पवार गटातील मधुकर राळेभात भाजपमध्ये गेल्याने जामखेड तालुक्यात भाजपची ताकद वाढलेली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसणार आहे. जामखेडप्रमाणेच कर्जत तालुक्यातील शरद पवार गटातील काही कार्यकर्ते आता भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते कार्यकर्ते कोण याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
आमदार रोहित पवार यांच्या विजयात मागील निवडणुकीत मधुकर राळेभात यांचा मोठा वाटा होता. मात्र या पंचवार्षिक निवडणुकीत राळेभात यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांच्या भाजमध्ये जाण्याने भाजपची ताकद वाढलेली आहे. त्याचा फायदा आगामी काळात भाजपच्या उमेदवारांना होणार आहे.
पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. विरोधी गटातील लोकांना बरोबर घेतले जाते. काम करताना मित्र पक्षातील नेत्यांनाही अंधारात ठेवले जात आहे. अशी चर्चा सध्या शरद पवार गटातील कार्यकर्त्यांची सुरु आहे. नव्या कार्यकर्त्यांना पुढे घेतले जात असून जुन्या जाणकारांना बाजुला लोटले जात आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्यावर कार्यकर्ते नाराज असून या पक्षातून त्या पक्षात कार्यकर्त्यांच्या उड्या सुरु आहेत.
या दोन्ही नेत्यांना तिसरा पर्यात मिळाल्यास मतदार व कार्यकर्ते त्याच्या मागे ठामपणे उभे राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या मतदारसंघात सक्षम तिसरा पर्याय उभा राहावा, ्शी अपेक्षा सर्वांची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इतर नेत्यांकडून तसे प्रयत्न सुरु असून तालुक्यातील काहींना पुढे आणण्याचा प्रयत्न सध्या या दोन्ही मतदारसंघात सुरु आहे. तसे झाल्यास दोन्ही आमदारांना चांगलाच धडा मिळणार आहे.
.jpg)
Post a Comment