नगर ः श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काॅंग्रेस आपला उमेदवार बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकास कामे झाल्याचा दावा केला जात असला तरी फारशी कामे झालेली नाहीत. त्यामुळेय ामतदारसंघातून काॅंग्रेस आपला उमेदवार बदलेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती शिर्डी येथे पार पडल्या. यावेळी पक्ष निरीक्षकांच्यासमोर काॅंग्रे
शिर्डी येथील हाॅटेलमध्ये काॅंग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या वेळी पक्षनिरीक्षक महारष्ट्र प्रदेश काॅंग्रेसचे कार्याध्यक्ष मजफ्फर हुसे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आदी उपस्थित होते. श्रीरामपूर काॅंग्रेसमध्ये दोन गट आहेत. या दोन्ही गटात गेल्या अनेक दिवसांपासून वाद आहे. हा वाद काही केल्या मिटलेल्या नाही.
तो वाद अनेकदा अनेक कार्यक्रमाच्या वेळी समोर आलेला आहे. इच्छुकांच्या मुलाखतीच्या वेळीही हा वाद सर्वांसमोर आलेला आहे. या वादामुळे मात्र काॅंग्रेसची प्रतिमा मलीलीन झालेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी वागणे हे पक्षाच्या प्रतिमाला धक्का देणारे आहे.
निवडणुकीच्या काळात तरी कार्यकर्त्यांनी शांत भूमिका घेणे गरजेचे आहे. आपल्यातच एक मत नसेल तर मतदार आपल्याला मत कशी देतील, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
त्यामुळे या मतदारसंघातून उमेदवार बदलण्याच्या त्वरित हालचाली करून नवीन व्यक्तीला येथे संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात काय झाले हे सर्वांना माहिती आहे, त्यावर कोणीही स्पष्ट बोलत नाही. परंतु सर्वांना माहिती आहे, असे विरोधक बोलत आहेत.
Post a Comment