राजळेंकडून अर्धवट कामांची उदघाटने...भवानगड पाणी योजना पूर्ण का केली नाही...

पाथर्डी ः मतदार संघामध्ये जे कामे अर्धवट आहेत, ती पूर्ण न करता त्या कामाची उद्घाटने व हारतुरे नारळ घेणे आमदारांनी बंद करावीत. जर कामच पूर्ण नाही तर हार नारळ कोणाचे व कशासाठी घेत आहे. तुम्हाला खरंच जर जनतेचा कळवळा असता तर भगवानगड पाणी योजना पूर्ण केली असती व पूर्ण करून मगच सत्कार घ्यायचे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी केले. 


माणिकदौंडी येथे आज दि.(०५) रोजी कार्यकर्त्याचा मोठा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी श्रीधर महाराज शिंदे हे होते. या कार्यक्रमास जगन्नाथ गावडे, रामभाऊ साळवे, सरपंच मिठूभाऊ चितळे, सरपंच विकास राठोड, विष्णू कोठे, दिगंबर चितळे, सुरेशराव पवार, फकीर मोहम्मद पठाण, जलीलभाई पठाण, बाळासाहेब आंधळे, सुरेश चौधरी, फैयाज पठाण, अशोक ढाकणे, प्रभाकर मार्कंडे, वैभव पुरनाळे, बिलालभाई पठाण, समीर आठरे, रज्जाकभाई शेख, अमोल शेळके, भाऊसाहेब सातपुते, भाऊसाहेब मडके, आबासाहेब बेडके, शिवाजी मडके, फकीर मोहम्मद पठाण, अकबर पठाण, मानसिंग सांगळे, लक्ष्मण राठोड, रोहित तोडकर, अण्णा फुंदे, सिराज शेख, जगन्नाथ भापकर, देवराव दारकुंडे, विनायक देशमुख, सुनील शेळके, रवींद्र नवगिरे, दिलीप मोहिते आदी उपस्थित होते.

काकडे म्हणाल्या की, सध्या फक्त नारळ फोडणेचे कार्यक्रम लोकप्रधिनीच्या माध्यमातून चालू आहे. मतदारसंघातील कोणत्याच गावात ठोस कामे नाहीत, रस्ते नाहीत, पिण्यास पाणी नाही मग यांनी कसला विकास केला ? मूलभूत गरजा पासून त्यांनी तालुका वंचित ठेवला आहे. सत्ता कशासाठी असते गोरगरिबांची सेवा व्रत तुम्ही सत्तेच्या माध्यमातून घ्यायचे असते. परंतु तुम्ही फक्त स्वतःचे, संस्था बगलबच्चे मोठे केले. हे साखरसम्राट एकच आहेत त्यांची अजूनही मिलीभगत आहे. 

त्यांना फक्त मी सत्तेत नकोय त्यासाठी त्यांच्या बैठका होत आहेत. कारण गोरगरीब जनता आता त्यांची राहिली नाही. माझ्याकडे कोणताही मोठा पुढारी नाही चिल्लर माणसं माझ्याकडे आहेत. परंतु चिल्लरचाच आवाज यावेळी मतदारसंघात होणार आहे. माझी लहान लहान माणसं आता पेटून उठलेले आहेत. मला या माणिकदौंडीमध्ये पोलीस स्टेशन, शैक्षणिक सुविधा, मुलांसाठी अकॅडमी, सुसज्ज ग्रंथालय , पिण्याचे स्वच्छ पाणी , रस्ते आदी मूलभूत सुविधा द्यावयाच्या आहेत. मला गरिबांची हिताची कामे करायची आहेत म्हणून मला यावेळी आमदारकीची संधी द्या. 

इतक्या दिवस तुम्ही यांनाच मत दिली आहेत एक वेळेस बदल करून पहा. तुमच्या लहान लहान समस्या असतात त्या सोडविल. मतदारसंघात रस्ते विज पाणी या सुविधा देईल असेही सौ काकडे म्हणाल्या. तसेच यावेळी अमोल शेळके यांनी दोन लाख व सतिष आठरे यांनी दीड लाख रुपयांचा निधी काकडे यांना निवडणुकीसाठी निवडणूक निधी म्हणून दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post