विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी अकोल्यातील त्या प्राध्यापकावर गुन्हा...

अकोले : अकोल्यातील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी प्राध्यापकावर अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


यासीन गुलाबभाई सय्यद (रा. नवलेवाडी, अकोले) असे या प्राध्यापकाचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनीला धमकावल्या प्रकरणी प्राध्यापकाची पत्नी दिलशाद यासीन सय्यद हिच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी २२ वर्षीय पीडित विद्यार्थिनीने पोलिसात फिर्याद दिली आहे. येथील एका महाविद्यालयामध्ये ती शिक्षण घेत आहे. ३० जून २००४ रोजी रायगड जिल्ह्यातील एका तरुणाशी तिचे लग्न झाले होते. त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत सुरू होते. 

लग्नानंतर ती सासरी नांदत होती. ती ऑनलाइन शिक्षण घेत होती. पॉलिटेक्निक सायन्स विषयाचे प्राध्यापक यासीन गुलाब सय्यद तिला ऑनलाइन लेक्चर देत असे. 

दरम्यान, जून-जुलै महिन्यात तिला यासीन सय्यद याचे अचानक मोबाईलवर मेसेज येऊ लागले. 'तू मला आवडतेस', असे मेसेज तो करू लागल्याने तरुणी घाबरली होती. 

प्राध्यापकाने केलेल्या मेसेजबद्दल घरात कुणाला काही सांगितल्यास कॉलेजचे शिक्षण बंद होईल, या भीतीमुळे तिने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. याचा गैरफायदा घेत, प्राध्यापक सय्यद याने तिला वारंवार अश्लील मेसेज करण्यास सुरुवात केली. बळजबरी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

या गैरप्रकारातून तिने बऱ्याचदा स्वतःची सुटका करून घेतली. हा घडलेला प्रकार तिने सय्यद याच्या पत्नीला समक्ष भेटून सांगितला. मात्र, सय्यदसह पत्नी तिला म्हणाले, 'माझी बहीण डीवायएसपी आहे, तू आमची बदनामी केल्यास, तुला ठार मारू', असे धमकाविले. 

तुझे वडील दारू पितात. तुझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तुला आम्ही पैसे देऊ. तू  कोणाकडे ही गोष्ट उघड करू नको', असे प्राध्यापक सय्यदसह त्याच्या पत्नीने तिला धमकाविले.

दरम्यान, हा प्रकार मुलीच्या पतीला समजला. त्यांनी पीडित पत्नीला याबाबत वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वतःचे वैवाहिक जीवन खराब करायचे नसल्याने तिने पतीला काही सांगितले नाही. 

मात्र, पतीने तिचा मोबाईल पाहिला. प्राध्यापक सय्यद याने तिला केलेले मेसेज पतीने वाचले. यानंतर तिने सत्य घटना पतीसह परिवारातील सर्वांना बोलावून सांगितली. 

२५ नोव्हेंबर रोजी कॉलेजमध्ये या प्रकाराबाबत प्राध्यापक सय्यद यास विचारणा करण्यास गेले असता, सय्यद याने पतीसह एकाच्या अंगावर शाही फेकून त्यांना धक्काबुक्की मारहाण केली.

व या प्रकरणी यासीन गुलाबभाई सय्यद व पत्नी दिलशाद यासीन सय्यद (रा. नवलेवाडी) यांच्याविरुध्द अकोले पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मोहन बोरसे करीत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post