जिल्ह्यातील काहींचा पराभव पीएंमुळे..

अहिल्यानगर : जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे. काहींनी हा पराभवाची विविध कारणे सांगण्यास सुरवात केली आहे.  परंतु हा पराभव पीएची कार्यपध्दतीमुळे झाला असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. काहींचा मागेही तसाच पराभव झालेला आहे.


विधानसभा निवडणुकी झाली असून निकाल लागून आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. या आठ दिवसांपासून विजयी उमेदवाराची चर्चा होण्या ऐवजी पराभव झालेल्या उमेदवारांचीच चर्चा सध्या घडत आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभुतांकडे गर्दी होत आहे. विजयी उमेदवारांकडे मात्र तुरळकच कार्यकर्ते दिसून येत आहे. मात्र पराभूत उमेदवारांच्या घराकडे कार्यकर्त्यांचे जथ्थेच्या जथ्थे येत असून पराभवा संदर्भात आपण कोठे कमी पडलो याची चर्चा करीत आहे. 

नेत्याच्या पराभवाची कारणे शासनाने शेवटच्या टप्प्यात केलेल्या योजनांच्या खैरतीवर खापर फोडले जात आहे. परंतु आपल्या नेत्याचे काय चुकले यावर कोणीच बोलत नाही. कार्यकर्ते मात्र आता उघड बोलू लागले आहे. दबक्या आवाजातील चर्चा चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

साहेब चांगले आहेत... मतदारसंघात कामेही केली आहेत.. पण आपण काय पाच वर्षात कामे केली हे जनतेपर्यंत नेता आले नाही... पाच वर्षात सर्वसामान्य कामानिमित्त नेत्यांना भेटायला आल्यानंतर पीएंनी भेटून दिलेले नाही. काही पीएंनी नेत्यांचे निरोप सर्वसामान्यांकडे जाऊन दिले नाही. 

त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला नाही. निवडणुकीच्या अगोदरपासूनच काही नेत्यांचे पीए आपला नेता किती मतांनी विजयी होईल सांगत होते. त्याचा परिणाम निकालावर झाला. 

खोटी आकडेमोड आपल्या नेत्यासमोर मांडली. त्यामुळे उमेदवार व त्यांचे समर्थक  गाफील राहिले आणि पराभव झाला. पराभव होऊनही त्या नेत्यांकडे तीच मंडळी दिसून येत आहे.

काही उमेदवारांचा याच पीएंमुळे पराभव झालेला आहे. त्याच पीएंनी यावेळी आपल्या नेत्याचा घात केलेला आहे. आता तरी धडा घ्या व त्या पीएंची हकलपट्टी करावी असे मत कार्यकर्ते मांडत आहेत. 

काही दिवस दबक्या आवाजातील चर्चा आहात कार्यकर्ते उघड करीत आहेत. त्यामुळे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  आगामी निवडणुकीत हेच पीए राहिले तर पराभव निश्चित होणार आहे, असे कार्यकर्ते बोलत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post