सातारा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेने सतत पैशांची मागणी केल्याने तसेच चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात फेकून दिला.
वाकड येथे गत सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दिनेश पोपट ठोंबरे (३२, रा. बहुर, पो. करूंज, ता. मावळ) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
जयश्री विनय मोरे (२७, रा. मारुंजी, हिंजवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर जयश्री पतीसोबत राहत नव्हती, तर हिंजवडीतील कंपनीत सुपरवायझर असलेल्या दिनेशचे पहिले लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत.
तो सोशल मीडियावर विविध पोस्ट करायचा. पाच वर्षांपूर्वी दोघांची सोशल मीडियातून ओळख झाली. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांना तीन वर्षांचा मुलगा आहे.
दोघांचे काही दिवसांपासून पटत नव्हते. ती नेहमी त्याच्याकडे पैशांची मागणी करत असे. वेगळे राहायचे म्हणत असे. दोघे भूमकर चौक येथे गाडीत असताना वाद झाला. त्यानंतर दिनेशने गाडीत जयश्रीच्या डोक्यात घाव घातले. त्यातच तिचा मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंबाटकी घाटात गाडी घेऊन गेला. तेथे घाटात तिचा मृतदेह फेकला. त्यानंतर तो पिंपरी-चिंचवडमध्ये परतला. सोमवारी त्याने जयश्री बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलिसांत दिली
Post a Comment