नेवासा ः प्रहारचे उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण केलेली आहे. मुरकुटे यांना तालुक्यातील जनतेकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विजयाचे दावा करणारे आता थंडावले दिसून येत आहे. मुरकुटे यांचा झंजावत आज नेवासा मतदारसंघासह परिसरात राहणार आहे.
शनिशिंगणापूर, सोनई येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा झंजावत दौरा झाला. यामध्ये अनेकांनी त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. आज मुरकुटे यांचा झंजावत दौरा नेवासा, साईनाथनगर, पुनतगाव, इमामपूर,गोनेगाव, निंभारी, अंमळनेर, करजगाव, वाटापूर, तामसवाडी या गावांतील मतदारांशी मुरकुटे भेटी घेणार आहेत.
या सर्व गावात जाऊन रॅलीच्या माध्यमातून मतदारांशी माजी आमदार मुरकुटे संपर्क साधणार आहेत. दिवसें दिवस मुरकुटे यांच्या मतदारांशी संवादाला प्रतिसाद वाढत असून अनेकजम आपल्यालाच साथ असल्याचे सांगत आहेत.
Post a Comment