विठ्ठल लंघे यांना साथ म्हणजे नेवाशाच्या विकासाला हात..

नेवासा ः नेवासा विधान मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या लढतीमुळे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे उतरल्याने तालुक्यातील महायुतीमध्ये नवचैतन्य आलेले आहे. विठ्ठलाला साथ द्या. म्हणजे नेवाशाच्या विकासाला हातभार लागेल, अशी टॅग लाईन नेवाशात चर्चेत आलेली आहे. 

ने

वासा विधानसभा मंतदार संघात महाविकास आघाडीकडून आमदार शंकरराव गडाख,. महायुतीकडून विठ्ठल लंघे व प्रहार संघटनेकडून बाळासाहेब मुरकुटे व अपक्ष उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहे. या मतदारसंघातील चुरस विठ्ठल लंघे उभे राहिल्याने वाढलेली आहे. 

आमदार शंकरराव गडाख यांना दोनदा तर माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना एकदा नेवासा मतदारसंघाने संधी दिलेली आहे. त्यांच्याकडून विकास कामे काय झालेली आहेत, हे सर्वांना माहिती असून या दोन्ही नेत्यांच्या कामाचा आरसा सर्वांसमोर आहे. 

आता या वेळी विठ्ठलराव लंघे यांना संधी देऊन नेवाशाचा विकास करून घ्यायचा आहे, त्यामुळे विठ्ठला साथ नेवाशाचा विकास या टॅग लाईनचा वापर करून लंघे यांचा प्रचार सुरु झालेला आहे. 

लंघे यांच्या प्रचारात तालुक्यातील विविध गावातील तरूण सहभागी होत आहे. मुरकुटे व गडाख गटातील नाराज मंडळी लंघे यांच्या गोटात सहभागी होत असून प्रचाराची धुरा संभाळत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस लंघे यांची तालुक्यातील ताकद वाढत चालली असून विजयाचा मार्ग सुकर होत चालला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post