विना परवानगी वर्ग भरविले... महापालिकेकडून कारवाई....

अहिल्यानगरः महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) शाळेवर एक लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. 


याबाबत रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा संघटक मेहेर कांबळे यांनी केडगाव येथील बालाजी कॉलनी, अंबिका नगर येथे जैनाचार्य श्री शिवमुनीजी गुरुकुल (जेएसएस) स्कूलला पूर्व प्राथमिक मान्यता असताना विनापरवानगी प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग भरवले जात असल्याची तक्रार केली होती. 

या तक्रारीची महापालिका शिक्षण विभागाने दखल घेऊन अनधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश शाळेच्या मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना काढले होते. तसेच मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा दिला होता. 

मात्र शाळेने विनापरवानगी सुरू असलेले प्राथमिक व माध्यमिकचे वर्ग बंद केले नसल्याने महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी यांनी अनधिकृतपणे माध्यमिकचे वर्ग भरविल्याने बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) अन्वये शाळेला १ लाख रुपयांच्या दंडाचे आदेश काढले आहे. 

शाळेतील पाचवीच्या पुढील वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इतर शाळेत समायोजन करण्याचे आदेश संस्थाचालक व शाळेला दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post