अहिल्यानगर : राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाने रिक्त ग्रामपंचायतींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पुन्हा राजकीय वातावरण तापले आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतचा प्रभागरचना कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ डिसेंबरपासून प्रभागरचनेला प्रारंभ होणार असून, अंतिम प्रभागरचना २४ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कोकणगाव, मांडवगण, महांडूळवाडी, राजापूर, दानेवाडी या सहा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. पारनेर तालुक्यातील मसे खुर्द, राळेगाव थेरपाळ, तर संगमनेर तालुक्यातील काकावाडी, नान्नज दुमला दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अकोले तालुक्यातील साकीरवाडी, दिगंबर तर कर्जत तालुक्यातील कोळवडी, बनवडी दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अशा एकूण जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतीचा प्रभागरचना कार्यक्रम जाहीर झाला आहे.
जिल्ह्यातील १५६ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागा जानेवारीपासून रिक्त आहेत. यामध्ये काही निधन, तर काही राजीनामा दिलेल्या सदस्यांचा समावेश आहे.
अकोले तालुक्यात सर्वाधिक ६९, तर शेवगाव १९, संगमनेर १४ आणि नेवासा तालुक्यातील १० अशा प्रकारे १५६ सदस्यांच्या जागा रिक्त समावेश आहे.
Post a Comment