झावरे यांना झेडपी नको महामंडळ द्या....

पारनेर :  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे पुर्नवसन केले जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहे. परंतु त्यांचे पुर्नवसन करताना त्यांना झेडपी ऐवजी महामंडळ देण्यात यावे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे.


माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर कायमच अन्याय झालेला आहे. हा अन्याय दूर करणे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हाती आहे. 

याही वेळेस उमेदवारीला त्यांचा दावा होता. परंतु काशिनाथ दाते यांना उमेदवारी देऊन झावरे या़ंना थांबविण्यात आलेले आहे.

त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत गेलेला आहे. हा अन्याय दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे पुर्नवसन होणे गरजेचे आहे. 

हे पुर्नवसन करताना त्यांना जिल्हा परिषदेच्या ऐवजी एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. 

यासाठी आता पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांनी पक्षाच्या बैठकीत हा मुद्दा मांडून सुजित झावरे यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post