अहिल्यानगर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चुरशीच्या लढढती झाल्या असून धक्कादायक काही निकाल लागलेले आहेत. यात काहींना पहिल्यांदाच विजय मिळविलेला आहे. त्यामुळे या नवनियुक्त आमदारांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य नागरिक फोन करीत आहेत.
नवनियुक्त आमदार सध्या सत्कार समारंभात दंग झाले असून सर्वसामान्यांचे काॅल टाळण्यासाठी मोबाईल बंद करून ठेवत आहेत. काहींनी आपला संपर्क नंबरच बदलला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आतापासून आपण निवडून दिलेला मानूस चुकला की काय अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
सर्वसामान्य नेत्या म्हणून आपण ज्याला निवडून दिले. तिच व्यक्ती आपले काॅल जर आताच घेत नाही. फोन सुरु ठेवत नाही तर आगामी पाच वर्षात हे आपले काय काम करतील असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
आपण सर्वसामान्य व्यक्तीपासून समजून ज्यांना निवडून दिले ती आपली चूक तर होणार नाही ना असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागलेला आहे. कारण सर्वसामान्य समजून ज्यांना निवडून दिले त्यांच्या वागण्यातील बदल सर्वांनाच खटकू लागला आहे.
राज्यात अजून सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे कोणत्याच आमदाराकडून आपल्याला काही मागायचे नाही. सध्या त्यांच्या आनंदात फक्त आपल्याला सहभागीच व्हायचे असे असताना ही मंडळी अचानक कशी बदलली या प्रश्नाने सर्वसामान्यांना घेरले आहे.
या वेळी झालेली चूक आगामी काळात करायची नाही. विजयी आमदाराकडे काहीच काम घेऊन जायचे नाही. त्यांना पुन्हा संपर्क करायचा नाही असा निर्धार आता काही नागरिकांसह कार्यकर्त्यांनी केला आहे.
याबाबत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून संबंधितांविषयी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचा फटका पक्षासह नेत्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत बसणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इच्छूक धास्तावले आहेत.
Post a Comment