अबब कांद्याला वर्षातील सर्वाधिक भाव....

अहिल्यानगर : भानुदास कोतकर नेप्ती उपबाजारात गुरुवारी (ता.७) गावरान कांद्याची १६ हजार गोण्यांची आवक झाली. त्यातील १० उच्च प्रतीच्या कांदा गोण्यांना ७ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.


नेप्ती उपबाजारात झालेल्या कांदा लिलावात गावरान कांद्याच्या १६ हजार ५२० गोव्यांची आवक झाली. त्यात उच्च प्रतीच्या १० गोण्यांना प्रति क्विंटल ७ हजाराचा भाव मिळाला, तर १२ गोण्यांना ६ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला.

कांद्याचे प्रतवारीनुसार भाव : एक नंबरच्या गावरान कांद्याला ५ हजार ८०० ते ६ हजार ५०० प्रति क्विंटल दर मिळाला. दोन नंबर ४ हजार ८०० ते ५ हजार ८००, तीन नंबर ४ हजार ते ४ हजार ८००, चार नंबरला २ हजार २२० ते ४ हजारांचा भाव मिळाला.

लाल कांद्याची आवक जास्त होती. ८९ हजार २४० कांदा गोण्यांची आवक झाली. यात एक नंबर कांद्याला ४ हजार ३०० ते ५ हजार प्रति क्विंटलचा भाव मिळाला. दोन नंबर ३ हजार ३०० ते ४ हजार ३००, तीन नंबर २ हजार १०० ते ३ हजार ३००, चार नंबर १ हजार ते २ हजार १०० प्रति क्विंटलचा भाव मिळाला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post