कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत रोहित पवार की राम शिंदे विजयी होणार, अशी परिस्थिती असताना अखेर पवार यांनी विजय मिळविला. संध्याकाळी सात वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रोहित पवार यांना विजयी घोषित केले.
येथील दादा पाटील महाविद्यालयातील हॉलला सकाळी ८ वाजता सुरू झाली. पहिल्याच फेरीत रोहित पवारांनी आघाडी घेतली होती. तर लागलीच सहाव्या फेरीपर्यंत १ हजार ३२७ मतांनी राम शिंदे आघाडीवर राहिले.
सातव्या फेरीपासून १३ फेरीपर्यंत पुन्हा पवारांनी १ हजार ४० मतांची आघाडी घेत निकालाची उत्कंठा वाढवली. १४ ते १९ व्या फेरीपर्यंत शिंदेंनी पुन्हा मताधिक्य घेतले. २० व्या फेरीत पवार पुढे आले. कमी जास्त मतांनी दोघेही पुढे रहात होते.
यावेळी राम शिंदे यांनी फेर मतमोजणीची मागणी केली. शिंदे यांना १ लाख २६ हजार ४३३ मते मिळाली, तर पवार यांनी १ लाख २७ हजार ६७६ मते घेत १२४३ चे मताधिक्य मिळविले.
Post a Comment