पारनेरमध्ये काशिनाथ दाते विजयी...

पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते हे १ हजार ५२६ मतांनी विजयी झाले आहेत. काशिनाथ दाते यांना १ लाख १३ हजार ६३० मते, तर राणी लंके यांना १ लाख १२ हजार १०४ मते मिळाली आहेत. 


येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणी दरम्यान पहिल्या १४ ते १५ फेरीपर्यंत काशिनाथ दाते यांना चार ते पाच हजारांचे मताधिक्य होते. 

१५ व्या फेरीला राणी लंके यांना मतांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर २२ ते २३ फेरीपर्यंत लंके - व दाते या दोघांमध्ये दीड ते दोन हजारांच्या मतांची चुरस पाहायला मिळाली.

दाते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांचा पराभव केला. महायुती सरकारची लाडकी बहीण योजना, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पारनेर तालुक्यातील नेत्यांची मोट बांधल्याने दाते यांचा विजय सुकर झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post