शिर्डीमध्ये परिवर्तनासाठी लढाई...

संगमनेर : दडपशाही निर्माण करणारा राहाता तालुका राज्याने नव्हे तर देशाने पाहिला आहे. यावेळीची निवडणूक आमदार बाळासाहेब थोरात यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी तर राहाता तालुक्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे.


आश्वी गटामध्ये उमब्री,रहिमपूर, जोरवे,हंगेवाडी येथील प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित विविध बैठकांमध्ये ते बोलत होते. या वेळी गणपतराव सांगळे, राजेंद्र चकोर, विजय हिंगे, सुरेश थोरात, गीताराम गायकवाड, विक्रम थोरात, भाऊसाहेब शिंदे, मीनानाथ वर्पे, शिवाजी जगताप, सौ शितल उगलमुगले ,दिपाली वर्पे आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले की, भाजपा सरकार हे फसवे आहे. जातीच्या नावावर राजकारण करत आहे. समाजात - समाजात भेदभाव निर्माण करत आहे. राज्यघटना आणि लोकशाही मोडू पाहणाऱ्या भाजपचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे. मत विभाजनासाठी ती काम करत आहे, असे ते म्हणाले.

संगमनेर तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाची उंची मोठी असून त्यांना राज्यातून सर्वाधिक मतांनी निवडून देण्यासाठी संगमनेर तालुक्यातील जनतेने निवडणूक हाती घेतली आहे, असे गायकवाड म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post