नेवासा ः शंकरराव गडाख यांना दोनदा संधी दिली, बाळासाहेब मुरकुटे यांना एकदा संधी दिली. परंतु नेवाशाचा काही विकास झालेला नाही. आता नेवाशाचा विकास करायचा आहे. त्यामुळेच ताई... बाई अक्का विचार करा पक्का विठ्ठलला विधानसभेत पाठविण्याचा निर्णय करा पक्का... ही टॅग लाईन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं झाली आहे.
नेवासा विधान सभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शंकरराव गडाख, महायुतीचे विठ्ठलराव लंघे यांच्यात खरी लढत होत आहे. गडाख यांना उमेदवारी लवकर झाली होती. त्यामुळे सध्या त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत होते. परंतु ही आघाडीची कधीच पिछाडी झालेली आहे. सध्या विठ्ठल लंघे यांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे.
उमेदवारी उशिराने जाहीर होऊनही विठ्ठल लंघे यांनी तालुक्यात सर्वच गावात लंघे यांचे कार्यकर्ते प्रचार करीत पोहचले आहेत. त्यांनी प्रत्येक गावा-गावात संपर्क अभियान सुरु केलेले आहे. लंघे स्वतः गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. तसेच कार्यकर्तेही मतदारांच्या गाठीभेटीसाठी वाड्या-वस्त्यांवर पोहचत असून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत.
सध्या सोशल मीडियावर ताई... बाई अक्का विचार करा पक्का विठ्ठलला विधानसभेत पाठविण्याचा निर्णय करा पक्का... ही टॅग लाईन व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकजण या टॅगलाईननुसारच प्रचार करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Post a Comment