अकोले : तालुक्यातील एका गावात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली. तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकांनी पार्टीत मोठा राडा केला आहे. या प्रकरणाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. या मद्यपी शिक्षकांवर आता कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील एका शिक्षण संस्थेच्या काही शिक्षकांनी पार्टी केली. या पार्टीत मोठा राडा झाला. किरकोळ वाद विकोपाल गेलेला असून एका शिक्षकाने तर एका गँगची धमकी दिली. त्यामुळे पार्टीतील सर्वांचीच पळापळ झाली. जेव्हढी दारुची नशा चढली होती. तेव्हढी त्यातील पिणारांची उतरली.
अकोले तालुक्यात एका शिक्षण संस्थेच्या चार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता सेवानिवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात मिळाल्या. त्यामुळे पार्टी शनिवारी आयोजित केली.
शनिवारी सकाळी बारा वाजता शाळा सुटली. कोतुळ- भोळेवाडी रस्त्यावर एका हॉटेलात ही पार्टी झाली. पार्टीत ते सर्व जर होते. त्यातील काहींनी नशा केली तर काहीजण जेवायला बसलेले होते.
त्यातच दोघांमध्ये वाद झाले हे वाद इतके विकोपाला गेले की त्यातील एकाने गँगची धमकी दिली. त्यामुळे सर्वांचीच पाचावरधारण बसली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या पार्टीतील वादाने शिक्षकांची प्रतिमा मलीन झालेली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. असेच प्रकार जर सुरु राहिले तर शिक्षणाचा दर्जा घरून सुसंस्कृत पिढी घडण्याऐवजी दारुडी पिढी तयार होईल. त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
या पार्टीत माध्यमिक शिक्षण विभागाचीही पोलखोल करण्यात आलेली आहे. शिक्षण विभागात कशा पध्दतीने फाईल अडविल्या जातात. त्यांचा कसा प्रवास पुढे करावा लागतो, याची इतंभूत माहिती काहींनी यावेळी एकमेकांना सांगितली.
ही चर्चा कितपत खरी त्या शिक्षकांना माहिती आहे. परंतु शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाची झालेली पोलखोल तालुक्यातच नव्हे आता जिल्ह्यात चर्चा विषय बनली आहे. या पार्टीची चर्चा जिल्हातील शिक्षकात रंगली होती. या अगोदरही शिक्षणची पार्टी रंगल्याची चर्चा सुरू आहे.
Post a Comment