पारनेर : पारनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहे. यामुळे तालुक्याचे राजकीय वातावरण तापणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणार आहेत.
तालुक्यातील म्हसे खुर्द, राळेगाव थेरपाळ या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व रहावे यासाठी आमदार काशिनाथ दाते व खासदार निलेश लंके यांच्याकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
दाते व लंके समर्थकांकडून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे ही निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी रंगीततालीम जिल्हा परिषदेचीच होणार आहे.
भावी जिल्हा परिषद सदस्यांनीही तालुक्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्याचा फायदा त्यांना झेडपी निवडणुकीत होणार आहे.
पुन्हा पारनेर दहशतमुक्त करायचा नारा होणार आहे. परंतु विकास काय करणार यावर कोणीच बोलणार नाही. विधानसभा निवडणूक झाली आहे. आता विजयी सभा होत आहेत. या सभांमध्येही पारनेरमधील दहशत हटवायची हेच भाषणे पुढे येत आहेत.
पारनेरचा विकास कसा करणार, आगामी काळात काय व्हीजन आहे, हे मांडले जात नाही. त्यामुळे पारनेर तालुक्यातील जनता त्याच त्या भाषणांना कंटाळली आहे.
Post a Comment