श्रीरामपूर : रामपूर-कोकरे येथील महिलांनी अचानक अवैध दारू धंद्याविरोधात हत्यार उपसल्याने गोदावरी पट्ट्यातील महिलांचा रुद्रावतार दिसून आला. संतप्त महिलांनी दारूचा अड्डा पेटवून देत हॉटेलमधील दारूच्या बाटल्या फोडल्या.
श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी पट्ट्यातील रामपूरवाडी-कोकरे येथे आक्रमक महिलांनी अवैध दारूचा अड्डा जाळला. रामपूर रस्त्यावर एका हॉटेलमध्ये अवैध दारू विकी सुरू होती. हे लक्षात येताच महिलांनी आपला मोर्चा त्या दुकानाकडे वळवला. दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या. ही घटना रविवारी सकाळी घडली.
रामपूर-कोकरे येथील महिलांनी अचानक अवैध दारू धंद्याविरोधात हत्यार उपसल्याने गोदावरी पट्ट्यातील महिलांचा रुद्रावतार दिसून आला. संतप्त महिलांनी दारूचा अड्डा पेटवून देत हॉटेलमधील दारूच्या बाटल्या फोडल्या. अनेक दिवसांपासून महिलांनी प्रशासनाकडे या अवैध धंद्याविरोधात तक्रारी केल्या.
त्यावर कोणतीही कारवाई प्रशासनाकडून केली जात नव्हती. महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दुकाने व हॉटेलमध्ये घुसून दारूच्या बाटल्या फोडल्या. दुकान पेटविले.
महिलांना दारू विक्रेत्याकडून दमदाटी, अरेरावी केल्याची चर्चा परिसरात सुरू होती. अवैध दारु अड्डे चालवणाऱ्यांना कोण पाठबळ देते? असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. दारू आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
Post a Comment