अहिल्यानगर : राज्यात आता भाजपा महायुतीचे सरकार आल्याने साई संस्थानच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत.
साई संस्थानच्या अध्यक्षपदी वर्णी कोणाची लागणार यावर सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांची नावे सध्या चर्चेत आहे. त्यामुळे आगामी काळात शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार याची सध्या फक्त चर्चाच सुरू आहे.
काहींनी अध्यक्षपद आपल्यालाच मिळणार असल्याची प्रसिध्दी अवई उठवून दिलेली आहे. स्वीय सहायकामार्फत प्रचार सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. प्रत्यक्षात हे पद कोणाला मिळणार स्पष्ट झालेले नाही.
या पदावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट यांनी दावा केलेला आहे. त्यामुळे हे पद नेमके कोनाला मिळणार याचीच सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. सध्या चर्चेत असलेली नावे सगळ्या वावड्या असल्याचे बोलले जात आहे. (क्रमश:)
Post a Comment