या कारणाने लाडक्या बहिणींचे अर्ज बाद होणार...

मुंबई : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली. नंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. महायुतीला निवडणुकीत मिळालेल्या यशामागे लाडक्या बहि‍णींचा मोठा वाटा आहे. 


डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. दरम्यान, जर तुम्ही आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचे अर्ज बाद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. 

महायुती सरकारने लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याची ग्वाही दिली आहे. याची अंबलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे. म्हणजेच महिलांना २१ एप्रिलपासून २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.

परंतु लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असणे गरजेचे आहे. जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. 

त्यामुळे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक करण्यास सांगिले आहे. लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत.परंतु ज्या महिलांनी आधार कार्ड लिंक केले नाही त्यांना पैसे मिळाले नाहीत.

ज्या महिलांनी सुरुवातीला अर्ज केले आहेत परंतु त्यांना पैसे आले नाहीत त्यांना पुढच्या महिन्यात एकदम ६ हप्ते येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरला असेल अन् आतापर्यंत एकही रुपया तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला ९००० रुपये मिळू शकतात. आतापर्यंत आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने १६ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post