पारनेरातील प्रश्न सोडविण्यासाठी दाते यांचा पुढाकार...

पारनेर : आमदार काशिनाथ दाते यांनी निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कुकडी डावा कालवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेत पाणी आणले. त्यामुळे ते तालुक्यातील प्रश्न मार्गी लावतील अशी आशा सर्वांना लागली आहे.


दाते यांनी दिव्यांग्याचा प्रश्न विधानसभेत मांडीत सोडविण्यासाठी प्रयत्न केला. महायुती सरकार व आमदार दाते असा एक चांगला समन्वय झाला असून मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार दाते यांचे प्रयत्न सार्थकी लागणार असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.

दाते यांनी एमआयडीसीचा प्रश्नही हाती घेतला आहे. त्यामुळे तालुक्यातील तरुणांना येथे रोजगार उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अधिवेशात व मंत्र्यांना भेटू प्रश्न मार्गी लागणार नाही तर उद्योजकांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्या लागणार आहे. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post