मुंबई : मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून काम केले आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे हे दरेगावला का गेले? ते नाराज आहेत का? असा सवाल सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता. यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील.
मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम केलं. अडीच वर्षांमध्ये आम्ही भरभरून काम केले.
मी देखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सर्व सामान्य लोकांना काय पाहिजे याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे लोकही या सरकारला आपलं लाडकं सरकार म्हणतात.
महाविकास आघाडीने जे प्रकल्प रखडवले होते, त्याला आम्ही चालना दिली, लोकांनी देखील आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Post a Comment