सोलापूर :ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याबद्दल छाती बडवण्याची मला सवय नाहीये. मी आणि माझा समाज मैदानातच नाहीये, यावेळी दोरी मराठ्यांच्या हातात होती. मालक तो होता आणि त्याला कोणाच्या दावणीला न बांधता त्यालाच मालक ठेवले. विधानसभेत मी समाजाला सांगितले होत त्यांना जे करायचं आहे, ते करा, तसं त्यांनी केलं, मी समाजाची फरपट होऊ दिली नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपली पुढची दिशा ठरवली आहे. सोलापूरमधून त्यांनी नव्या सरकारला इशाराच दिला आहे. आरक्षण घेतले तर ओबीसीमधूनच घेणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होणार आहे.
अंतरवली सराटीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत. राज्यभरातले मराठे आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहेत.
त्यांच सरकार तयार झाले की मी आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आणि हे उपोषण मुंबईत सुद्धा होऊ शकतं, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिलाय.
Post a Comment