देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे नेते...

संगमनेर : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस मोठ्या मनाचे नेते' असेही पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.


फडणवीस यांची २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. २०१४ ते २०२४ या दशकात विविध भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेले निर्णय पाहता त्या शुभेच्छा योग्य ठरल्या याचा आनंद आहे, असे तांबे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आहे. फडणवीस हे उत्तम वक्ते, मोठ्या मनाचे नेते, दूरदृष्टीचे नेते व सहज उपलब्ध असलेले आहेत, असा उल्लेख करताना 'दिल्लीचेही तख्त राखितो' या गीताचाही तांबे यांनी उल्लेख केला आहे. फडणवीस व तांबे यांचे मैत्रीचे संबंध आहेत. 

तांबे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाला फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांना उद्देशून 'आमचे सत्यजितकडे लक्ष आहे' असा उल्लेख केला होता. तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवलेली आहे. 

या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. मामांची साथ करतानाच त्यांनी फडणवीस यांच्यासोबतची मैत्रीही कायम ठेवलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post