नेवासा ः छडी लागे छम छम विद्या येई घम घम .. हे वाक्य आता इतिहासात जमा झालेले असे वाटू लागलेले आहे. नेवासा तालुक्यात एका शाळेत पैसे दिले नाही तर मार्क मिळणार नाही, असा दम शाळेतील शिक्षकांकडून दिला जात असल्याची तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया असलेले व्हीडीओही समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे तालुक्यासह राज्यभर या शाळेची चर्चा सुरु झालेली आहे पैसे द्या अन् मार्क घ्या असेच प्रत्येकजण म्हणू लागलेले आहे.
नेवासा तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रत्येक विषय शिकवण्यासाठी शिक्षक ७०० रुपये महिना पैसे घेत आहे. त्यामुळे पालकांवर हा आर्थिक भार पडलेला आहे.
याबाबत एका पालकाने शाळेच्या प्रशानाच्या कारभाराची व्हीडीओ तयार करून पोलखोल केलेली आहे. या पोलखोलमुळे शाळेतील सर्वच प्रकार आता चव्हाट्यावर आलेला आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरु आहे
हा प्रकार शाळेत होऊनही त्याची माहिती संस्था चालकांना नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. संस्था चालकांमधील काहीजणांना सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेत काय चालले माहिती झाले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत संस्थाचालकांनी स्पष्ट असे काहीच मत व्यक्त केेलेले नाही.
एका पालकाने शाळेत होत असलेल्या प्रकाराची पोलखोल केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शाळेने आता शाळेत येणाऱ्या व जाणाऱ्यांची चौकशी सुरु केलेले आहे.प्रवेशद्वार बंद ठेवले जात आहे. प्रवेशद्वारातच परिचर बसून ठेवलेला आहे.
शाळेत येणाऱ्या व जाणाऱ्यांची चौकशी आता सुरु केलेली आहे. विद्यार्थी शाळेत आल्यानंतर गेट बंद केले जात असून मुलांना मध्येच बाहेर जावून दिले जात नसल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु झालेली आहे.
शाळेची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे गेलेली आहे. या प्रकरणी त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेवासा तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांकडे पैसे घेतले जात असल्याचा प्रकाराची चर्चा राज्यभर झालेली आहे. या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला जाणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरु झालेली आहे.
नेवासा तालुक्यातील काहींनी याबाबतचे सगळे व्हीडीओ राज्यातील काही आमदार महोदयांना पाठविलेले आहे. त्यामुळे हा प्रश्न अधिवेशनात चर्चिला जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
नेवासा तालुक्यातील त्या शाळेतील शिक्षक अध्यापनाचे काम सोडून दुसरेच उद्योग करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. शाळेच्या वेळेतही ती मंडळी आपला आर्थिक स्थर उंचाविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. काहीजण प्रसिध्दीसाठी मान्यवरांना बोलवून आपलं वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मान्यवर मंडळींची हाॅटेलांमध्ये शाळेच्या वेळेत शिक्षक मंडळी सरबती करीत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.ही मंडळी संस्था चालकांची निकटवर्ती असल्यामुळे ते सध्या सुसाट सुटले असल्याची चर्चा आहे. याकडे मात्र संस्था चालकांचे दुर्लक्ष झालेले असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment