दहशतीच्या मुद्द्यावरील पारनेरमधील राजकारण थांबवा...

पारनेर : पारनेरमध्ये दहशत असल्याचा मुद्दा उपस्थित करून राजकारण केले जात आहे. या दहशतीच्या मुद्द्याचा राजकारणासाठी आता सर्रास वापर केला जात आहे. पण त्यामुळे तालुक्याची बदनामी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू आहे. सुसंस्कृत तालुक्याची बदनामी थांबवा अशीच म्हणण्याची वेळ पारनेरकरांवर आली आहे.


पारनेर व सुपा एमआयडीसीत दहशत असल्याचा मुद्दा राजकीय नेते उपस्थित करून पारनेरची बदनामी करीत आहे.  विधामसभा निवडणुकीत हाच मुद्दा उपस्थित करून मोठे राजकारणही झाले आहे. 

जे आता हा आरोप करीत आहेत. त्यांच्याकडे किती उद्योजकांच्या तक्रारी आहेत, किती सुपा एमआयडीसीत दहशत म्हणार्यांनी बैठका घेतल्या आहेत याची आकडेमोड सर्वसामान्य पारनेकरांसमोर मांडावी असे मत पारनेरकर व्यक्त करू लागलेले आहे. 

राजकारणाच्या खेळात सुसंस्कृत तालुका आता बदनाम होत असून ही बदनामी त्वरित थांबवून संस्कृत तालुक्याची ओळख संपू्र्ण राज्याला होण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पारनेकरांमधून व्यक्त होत आहे.

निवडणुकीपुरता हा मुद्दा राहील असे सर्वांना वाटत होते. मात्र आता पुन्हा हा दहशतीचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे पारनेरकर पुन्हा नाराज झालेले असून हा प्रकार नेते मंडळींनी थांबवावा अशी मागणी होत आहे.

पारनेरमध्ये नेमकी दहशत कोणाची आहे, हे आरोप करणार्यांनी आता पुराव्यानिशी जाहीर करावे.नुसते आरोप करून आपला राजकीय स्वार्थ करून घेणे थांबविणे गरजेचे आहे. पारनेरमध्ये  जर दहशत असती तर त्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले असते. 

मात्र तसे गुन्हे दाखलही झालेले नाही. इतर तालुक्यांच्या तुलनेत पारनेरचा क्राइम रेट कमीच आहे. काहीच प्रकार नसल्याने राजकारणासाठी हा दहशतीचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचा आरोप आता पारनेरकांमधून केला जात आहे. 

साप साप म्हणून भुई धोपटणे आता तरी थांबा अशी म्हणण्याची वेळच आता पारनेरकरांवर आली आहे. आपल्या स्वार्थासाठी तालुक्याची बदनामी का केली जाते असा थेट सवाल आता पारनेरकर करीत आहेत.

विधानसभा निवडणुकीपासून आजपर्यंत सत्ताधारी गटाकडून पारनेरमध्ये दहशत असल्याचा आरोप केला जात आहे. सत्तेत असणार्यांची चलती असते. मात्र पारनेरमध्ये उलट परिस्थिती नेमकी कशी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post