पारनेर : तालुक्यातील पठार भागाचा दोन टीएमसी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागणी आमदार काशिनाथ दाते यांनी केली.
नागपूर येथील विजयगड निवासस्थानी आमदार काशिनाथ दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड उपस्थित होते.
पारनेरच्या पठार भागाचा पाण्याच्या २ टी.एम.सी. संदर्भात तसेच सुपा एमआयडिसीचा विस्तार करण्यात यावा यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. पारनेर तालुक्यातील पठार भागाचा दोन टीएमसी पाणी प्रश्न सोडवण्याचा आग्रह केला.
पठार भागाचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यास पारनेर तालुक्याची दुष्काळी ओळख काही अंशी का होईना कमी होईल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल.
तसेच सुपा एमआयडीसीचा विस्तार झाल्यास मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळेल, या रोजगाराच्या माध्यमातून आर्थिक सुबलता येईल, तरुण आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे एमआयडीसी कडे लक्ष देण्याची मागणी आमदार दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
------
Post a Comment