शिक्षकेतर संघटनेचे १९ जानेवारीला राज्य अधिवेशन... गोवर्धन पांडुळे यांची माहिती : मुख्यमंत्री उपस्थित राहणार

अहिल्यानगर : चंद्रपुर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या ५२ व्या राज्य अधिवेशनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या अधिवेशनात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर बांधवांनी अधिवेशनात सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे यांनी केले आहे.


शिक्षकेतर संघटनेच्या राज्य महामंडळाचे ५२ वे राज्य अधिवेशन शहिद बालाजी रायपूरकर सभागृह,  पिंपळनेरी रोड, चिमूर,  जि.चद्रंपूर येथे रविवार (ता. १९) रोजी होणार आहे. या अधिवेशनासाठी शिक्षण संचालकांनी परवानगी दिलेली आहे.

या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे तसेच अनेक मंत्र्यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. सावंतवाडी येथे जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या अधिवेशनात तात्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहिर केल्याप्रमाणे सर्व शिक्षकेतर भावा-बहिणींना १ जानेवारी २०२४ पासून सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे. 

राज्यातील हजारो भावा-बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे.  यासारखे अनेक प्रलंबित प्रश्नांवर या अधिवेशनामध्ये  चर्चा होणार आहे. यामध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकेतरांची नवीन भरती सुरू करणे. शिक्षकेतरांसाठी बक्षी समितीने सुचविलेली अश्वासित प्रगती योजना म्हणजे १०-२०-३० लागू करणे, शिक्षकेतरांना पदोन्नतीची संधी देणे. शिक्षकेतर सेवक पदावर अनुकंपा तत्वावर भरती करणे यासह शिक्षकेतरांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे.

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्य अध्यक्ष अनिल माने, सचिव शिवाजी खांडेकर, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे आणि राज्य महामंडळाचे सर्व पदाधिकारी अहो रात्र झटत आहेत. 

त्यामुळे या महत्त्वपूर्ण अधिवेशनात अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष भीमाशंकर तोरमल, सचिव भानुदास दळवी, कार्याध्यक्ष भागाजी नवले, पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळे, ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब थोटे, उपाध्यक्ष पद्माकर गोसावी, निवृत्ती लोखंडे, जयराम धांडे, अंतर्गत हिशोब तपासणीस किशोर मुथ्था, खजिनदार विजय हराळे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post