नेवासा - तालुक्यातील एका शाळेतील प्रकार आता चव्हाट्यावर आलेला आहे. या शाळेवर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवासांपासून विद्यार्थ्यांना पैसे मागितले जात होते, अशी चर्चा आता तालुक्यात सुरु झालेली आहे.
नेवासा तालुक्यातील एका शाळेत विद्यार्थ्यांकडून प्रत्येक तासासाठी ७०० रुपये शुल्क आकारले जात आहे. या शाळेतील पैसे वसुलीची पोलखोल एका सामाजिक कार्यकर्त्याने केलेली आहे ही बाब चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून शाळेतर्फे प्रयत्न करण्यात आलेले आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरु आहे.
हा प्रकार शाळेत होऊनही त्याची माहिती संस्था चालकांना नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. संस्था चालकांमधील काहीजणांना सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर शाळेत काय चालले माहिती झाले असल्याचे बोलले जात आहे. याबाबत संस्थाचालकांनी स्पष्ट असे काहीच मत व्यक्त केेलेले नाही.
Post a Comment