अध्यापनाचे सोडून नेवाशातील त्या शाळेतील शिक्षक आर्थिकस्तर उंचावण्यात व्यस्त

नेवासा  :  तालुक्यातील त्या शाळेतील शिक्षक अध्यापनाचे काम सोडून दुसरेच उद्योग करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे. शाळेच्या वेळेतही ती मंडळी आपला आर्थिक स्थर उंचाविण्याचा प्रयत्न करीत आहे. 


नेवासा तालुक्यात एका शाळेत पैसे दिले नाही तर मार्क मिळणार नाही, असा दम शाळेतील शिक्षकांकडून दिला जात असल्याची तक्रार  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे. 

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया असलेले व्हीडीओही समाज माध्यमावर व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे तालुक्यासह राज्यभर या शाळेची चर्चा सुरू झालेली आहे. पैसे मागणार्या त्या शिक्षकांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.

काहीजण स्वत:चा मोठेपणा मिरविण्यासाठी तसेच प्रसिध्दीसाठी मान्यवरांना बोलवून आपलं वर्चस्व सिध्द करण्याचा प्रयत्न करीत आहे. या मान्यवर मंडळींची हाॅटेलांमध्ये शाळेच्या वेळेत शिक्षक मंडळी सरबती करीत असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे.

ही मंडळी संस्था चालकांची निकटवर्ती असल्यामुळे ते सध्या सुसाट सुटले असल्याची चर्चा आहे. याकडे मात्र संस्था चालकांचे दुर्लक्ष झालेले असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा शिक्षकांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषद प्रशासन आता यावर कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच शाळेतील काहीजण पैशांचे व्यवहार करीत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post