अहिल्यानगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळात मागील वर्षीच फूट पडून बॅकेत सत्तास्थापन केलेली आहे. परंतु या संचालक मंडळात सध्या नाराजी असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे. काही संचालकांनी पूर्वीच्याच नेतृत्वाकडे जाण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरु आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत बापूसाहेब तांबे गटाची सत्ता होती. मात्र विरोधकांनी बॅंकेत सत्तांतर करण्यासाठी संचालक फोडून आपले वर्चस्व बॅंकेत प्रस्तापित केले. मात्र त्यांना संचालक मंडळात एकजुट ठेवण्यात अपयश आल्याची चर्चा सध्या सभासदांमध्ये सुरु आहे.
सत्ताधारी नेत्यांकडून काही नियमबाह्य कामे करण्यास संचालक मंडळाला भाग पाडले जात असल्याने संचालक नाराज झालेले आहे. नियमबाह्य कामे केल्यानंतर सर्वसाधारण सभेत सभासद आपल्याला जाब विचारतील, त्यामुळे सत्तेत राहण्यापेक्षा आपण बाहेर पडलेले बरे अशीच चर्चा काही संचालकांनी आपल्याजवळच्या व्यक्तींजवळ केलेली आहे. त्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये सुरु आहे. त्यामुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळात नक्कीच फूट पडणार असल्याची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरु आहे.
नाराज झालेल्या संचालकांनी पुन्हा एकदा पहिल्या नेत्यांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या जुन्या नेत्याजवळ असणार्यांशी संपर्क साधून पुन्हा आपण एकत्र येऊ असा निरोप पाठविला असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरु आहे.
जुने नेतृत्व पुन्हा या संचालकांना आपल्या गटात घेणार की हा गट आपला वेगळा सुवता सुभा तयार करणार याबाबत सध्या सभासदांमध्ये चर्चा सुरु आहे. जे जुन्या गटातून बाहेर पडलेले आहेत. त्या संचालकांना पुन्हा परत न घेण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या संचालक मंडळातील बाहेर पडणारा गट कोणाचे नेतृत्व स्वीकारणार याचीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे.
दरम्यान, याबाबत सत्तेत असलेल्या व विरोधक या गटाच्या नेत्यांशी संपर्क साधला असता अशी आमच्याशी कोणाची चर्चा झालेली नाही. मात्र सभासदांमधून अशी चर्चा आमच्यापर्यंत आलेली आहे.
Post a Comment