जिल्हा विभाजनाची फक्त अफवा..

अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्हा विभाजन होणार अशीच चर्चा जिल्ह्यात सुरु होती. जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी तशी वक्तव्य या अगोदर केलेली आहे. त्यामुळे ती वक्तव्य खोटी होती, असेच आता स्पष्ट होत आहे.


जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपण महसूलमंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताच प्रस्ताव आपल्या समोर आलेला नव्हता असे म्हटले आहे. त्यामुळे नव्याने असा प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो किंवा एखादा प्रस्ताव दाखल केला जाईल का अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. 

दरम्यान, जिल्हा विभाजन होणार असल्याच्या घोषणा जिल्ह्यातील महायुतीतील काही नेत्यांनी केल्या होत्या. दक्षिण तसेच उत्तर जिल्ह्यातील अनेक कार्यक्रर्मात दक्षिणतेतील महायुतीच्या नेत्यांनी विभाजनावर भाषणातून भाष्य केलेले आहे. मग त्यांचे भाष्य ते फक्त जनतेची फसवणूक करण्यासाठी होते का अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झालेली आहे. 

जनतेत महायुतीतील ते नेते भाषणातून विभाजनाचे वक्तव्य करून संभ्रम निर्माण करून देत असल्याचेच आता स्पष्ट होत आहे. विभाजनाचा महसूल विभागाकडे कोणताच प्रस्ताव गेलेला नसताना विभाजनाची वाकडी मग का उठवली जाते, अशीच चर्चा आता नागरिकांमध्ये सुरु आहे.

जिल्ह्याचे विभाजन गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे. त्यासाठी सर्वांनी गटतट विसरून पुढे येण्याची गरज आहे. तरच जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव होऊन तो मंजूर होऊ शकतो. अन्यथा फक्त जिल्हा विभाजनाच्या चर्चाच सध्या जिल्ह्यात सुरु राहणार आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post