ते संचालक सवतासुभा स्थापन करणार...

अहिल्यानगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत नाट्यमय घडामोडी घडू लागलेल्या आहेत. सत्ताधारी गटात फूट पडलेली आहे. या गटातून काही संचालक बाहेर पडणार आहेत. या संचालक मंडळांनी पूर्वीच्या गटाशी संपर्क साधला आहे. परंतु त्यांनी त्यांना घेण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे फुटीर गट सवतासुभा स्थापन करणार आहे.


जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळात मागील वर्षीच फूट पडून बॅकेत सत्ता स्थापन केलेली आहे. परंतु या संचालक मंडळात सध्या नाराजी असल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे. काही संचालकांनी पूर्वीच्याच नेतृत्वाकडे जाण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरु आहे.

काही संचालकांनी जुन्या नेत्याच्या संपर्कात जाऊन आपल्याला पुन्हा आपल्या गटात घ्यावे, यासाठी प्रयत्न केलेले आहेत. परंतु त्या नेत्याने गटातून बाहेर पडणाऱ्याला आपण पुन्हा आपल्या गटात संधी देणार नसल्याचे जाहीर सांगितले आहे. त्यामुळे नाराजांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 

ज्या हेतून संचालक बाहेर पडले होते. त्या हेतूलाच आता तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे संचालक मंडळातील काहींमध्ये चलबिचल सुरु झालेली आहे. ही चलबिचल नेत्यांच्याही लक्षात आलेली आहे. या सर्व हालचाली थांबविण्यासाठी नेत्यांनी नुकतीच बैठक घेऊन चर्चाही केली होती. परंतु त्यात ठोस निर्णय झालेला नाही. नाराजांची नाराजी कायमचं आहे.

या नाराजीतूनच काहींनी बाहेर पडून सवतासुभा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सवतासुभा स्थापन करून सत्ता मिळविण्यासाठी कोण पाठिंबा देणार याची चाचपणी सध्या सुरु झालेली आहे. जिल्ह्याती त्या नेत्याने फोडातोडीचे राजकारण नेहमीच केलेले आहे. परंतु हे राजकारण त्या नेत्याच्या वैयक्तीक स्वार्थासाठी असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. 

त्या नेत्याच्या वारंवार होणाऱ्या हस्तक्षेपाला संचालक कंटाळलेले आहेत. त्यामुळेच काही संचालकांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता ती खरा करतात की चर्चाच ठरवात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, तेजवार्ताने वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर शिक्षकांमध्ये चर्चेला आणखीच उधाण आलेले आहे. बॅकेतील एका नेत्याने नाराज कोण संचालक आहे, कशावरून आहे याचा शोध घेऊन त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. काहींना आगमी काळात अध्यक्ष व उपाध्यक्षपद देण्याचा शब्द दिलेला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post