अहिल्यानगर ः जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेतील संचालक मंडळात फूट पडणार आहे. ही फूट नेमकी कोणत्या कारणाने पडणार आहे, याचीच चर्चा सध्या जिल्ह्यातील सभासदांमध्ये सुरु आहे. प्रत्येकजण आपल्या परीने माहिती देऊन त्यावर चर्चा करीत आहे. मात्र या फुटीला फरकाची झालर असल्याची चर्चा आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेत बापूसाहेब तांबे गटाची सत्ता होती. मात्र विरोधकांनी बॅंकेत सत्तांतर करण्यासाठी संचालक फोडून आपले वर्चस्व बॅंकेत प्रस्तापित केले. मात्र त्यांना संचालक मंडळात एकजूट ठेवण्यात अपयश आलेले आहे. विरोधकांनी संचालक मंडळातील काही नाराजांना आपल्या हातशी धरून एकहाती सत्ता असलेल्या बॅंकेत फूट पाडली.
फरकावरूनच संचालक मंडळात नाराजी असून काही संचालकांनी आपली नाराजी पक्ष श्रेष्ठींसह आपल्याच जवळीच व्यक्तींना बोलून दाखविलेली आहे. ही नाराजीची वार्ता एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी जिल्हाभर झाली आहे. मागील काही वर्षात फरकाची चर्चा झाली नव्हती. मात्र आता पुन्हा फरकाची चर्चा सुरु आहे.
फरकावरून सत्तेत फरक पडला आहे. जवळचे आता लांब गेलेले आहेत. फरक कितीत आहे, कोणात किती आहे, याचाच अंदाज कोणाला येत नसल्याने सत्तेत फरक पडत चालला आहे, अशीच चर्चा सध्या सभासदांमध्ये सुरू आहे. फरकाने चांगलाच फरक पाडल्याने सभासदांमध्ये चर्चा सुरु आहे.
बॅंकेतील सत्ता परिवर्तन झाल्यापासून ते आजपर्यंत शिक्षक बॅंकेतील वातावरण तापलेले आहे. शिक्षकांमधील फोडातोडीचे राजकारणाने आता वेग घेतलेला आहे. बॅंकेमुळे आता संघटनांमध्ये फुटाफुटी सुरु झालेली आहे. बॅकेतील राजकारणामुळे संघटनेत काहींना पदापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे संतपालेल्या काहींनी बॅंकेत फूट पडावी, यासाठी विरोधकांशी हात मिळवणी सुरु केलेली आहे.
फरकावरून होणाऱ्या फाटाफुटीने शिक्षकातील वातावरण तापलेले आहे. सत्ताधारी सत्तेतून बाहेर पडून स्वतंत्र गट स्थापन करतात की जुन्या नेतृत्वाला जाऊन मिळतात, यावर सध्या सभासदांमध्ये चर्चा सुरु आहे. अद्याप फक्त ही चर्चा सुरु आहे. परंत ुसंचालक मंडळाकडून ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.
संचालक मंडळातील सुरु असले्ल्या घडामोडी पहाता सभासदांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. आपण नेमके कोणाला निवडून दिले असा थेट सवाल आता सभासद एकमेकांना करू लागलेले आहे. ज्या मंडळावर विश्वास ठेऊन आपण ज्यांना निवडून दिले ते सत्तेसाठी इकडून तिकडे व तिकडून इकडे जात आहे. त्यामुळे ही मंडळी सभासद हिताचे कामे कसे करील, असा थेट सवाल आता सभासदांमधून केला जात आहे.
Post a Comment