पारनेरच्या क्रांती शुगरने उसाला इतका भाव...

पारनेर : पारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील क्रांती शुगर कारखान्याने ऊसाला इतर साखर कारखान्यांना प्रमाणेच २८०० रुपये प्रति मॅटेक्ट्रीक टन भाव दिल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यां मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश नवले यांनी दिली आहे.


क्रांती शुगर कारखान्या ने या वर्षी नगर जिल्ह्यात सर्वांत जास्त ऊसाला शेकडा १० . ९१ टक्के उच्चांकी रिकव्हरी दिली आहे . कार्यक्षेत्र व बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षीच्या गळीत हंगामातील गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रीक्ट टन २८०० रुपये भाव देण्याचे जाहीर केले आहे. 

पंधरवाडा दि . १५ नोव्हेंबर ते दि . ३० नोव्हेंबर २०२४ मध्ये कारखान्याला आलेल्या ऊसाचे पैसे २, ७०० मॅट्रीक टना प्रमाणे पैसे अदा केलेले असून उर्वरित १०० रुपये मेट्रीक टना प्रमाणे राहिलेला फरक अदा करण्यात येणार आहे , तसेच त्या पुढील पंधरवाडात ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस दिला आहे , त्यांच्या ऊसाचे बिल २८oo रुपये प्रति मेट्रीक टन दराप्रमाणे लवकरच अदा करण्यात येईल .

क्रांती शुगर कारखान्याने आज अखेर १ लाख ७२ हजार ३५१ . ४९६ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले असून १ लाख ८६ हजार ११० पोती साखर उत्पादन झाले आहे . कारखान्या कडे पारनेर , श्रीगोंदा , नगर , श्रीरामपूर , पाथर्डी , शिरूर , जुन्नर तालुक्यातून बैलगाडी , ट्रॅक्टर , ट्रॅक द्वारे मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवठा होत असल्याने कारखाना पुर्ण क्षमतेने चालविला जात असून कारखान्याची प्रति दिन ३ , ५०० मॅट्रीक टन ऊस गाळपाची क्षमता असल्याची माहिती ही कारखान्याचे चेअरमन नवले यांनी दिली आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post