शिर्डीत एकाच रात्री तीन खून....

राहाता : शिर्डी संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आली. तर एका ग्रामस्थाची प्रकृती गंभीर आहे.


पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला तीन गुन्हे घडले आहेत. यामधील भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला. तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सुभाष घोडे हे मंदिरातील साईमंदिरातील कर्मचारी ड्युटीवर येत होते. तर नितीन शेजुळ हे सुरक्षा कर्मचारी ड्यूटी संपवून घरी निघाले होते. तर कृष्णा देहरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते. त्यांच्यावर अत्यंत प्राणघातक हल्ला झाला.

मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तीनही निरपराध नागरिकांवर चाकूनं असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

पोलिसांनी अपघात म्हटल्याने नातेवाईकांमध्ये संताप-पोलिसांनी अपघात असल्याचं सांगून घटना गांभीर्याने न घेतल्याने मृतांचे नातेवाईक आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. जोपर्यंत अटक होत नाही, तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे. या हत्याकांडामुळे शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे.

शिर्डी येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येतील का असा सवाल संप्तप्त नागरिकांमध्ये उमटत आहे.

योग्य उपाययोजना करण्याची मागणी- साईबाबा रुग्णालयात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी भेट देवून मृताच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post