पशुवैद्यकीय अधिकार्यावर धारधार शस्त्राने हल्ला..

शेवगाव : पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर जाधव (वय 45) यांच्यावर एकाने धारदार शस्त्राने चेहर्‍यावर वार करून अर्वाच्य शिवीगाळ करत जबर मारहाण केली. ही घटना  मंगळवारी (ता.22) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय कार्यालयातच घडली. 


जाधव यांच्या फिर्यादीवरून अनिस सय्यद (रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव, पूर्ण नाव माहिती नाही) आणि अनोळखी दोन व्यक्तींविरोधात सरकारी कामात अडथळा, जबरी चोरी व जबर मारहाणीचा गुन्हा मंगळवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आला.

या फिर्यादीत म्हटले आहे, 20 एप्रिलला सकाळी दहा वाजता फिर्यादी डॉ. जाधव पंचायत समिती आवारातील दत्त मंदिराचे दर्शन घेवून मंदिरापासून कार्यालयाकडे जात असताना अनिस सय्यद म्हणाला की, मला प्रोटेक्शन मनी (खंडणी) द्यावी लागेल. त्यावेळेस फिर्यादीने त्यास स्पष्ट नकार दिला. 

त्यानंतर 22 एप्रिलच्या सांयकाळी सव्वापाचच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या कार्यालयात असताना अनिस सय्यद व त्याचे सोबत दोन अनोळखी इसम (नाव, गाव माहीत नाही) डॉ. जाधव यांच्या कार्यालयात आले. 

ते म्हणाले की, तुला सांगितलेले पैसे तू का दिले नाही? असे म्हणत शिवीगाळ केली. एकाने धारदार वस्तुने चेहर्‍यावर मारहाण करुन फिर्यादीच्या खिशातून पाच हजार रुपये रोख रक्कम व गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेतली व निघून गेला. पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनखाली शेवगाव पोलिस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post