कार्यकाळपूर्ण होण्याअगोदर पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्यातर...

कर्जत : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. १३ नगरसेवकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्याकंडे अविश्वास ठराव दाखल केला होता.  हा ठऱाव एकदा नव्हे तर दोनदा दिला होता. त्यानंतर राऊत यांनी राजीनामाही दिला आहे. तेव्हापासून ज्या नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्या अजूनही घडत आहे.


कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या उर्वरीत कार्यकाळात दोन नगराध्यक्षा समान कालावधीसाठी होतील असे सभापती राम शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना सूचित केले असल्याची चर्चा आहे. कर्जत नगरपंचायतीच्या बंडाळीनंतर एकूण १३ नगरसेवक विधान परिषदेचे सभपती  राम शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यांनी पदाधिकारी निवडीचे सर्वाधिकार सभापती राम शिंदे यांना दिले होते. 

त्यावर सर्वांशी सकारात्मक चर्चा करीत उर्वरीत कार्यकाळात चार पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात येईल असा तोडगा राम शिंदे यांनी काढला असे सूत्रांकडून समजते. रोहिणी घुले आणि छाया शेलार यांना समसमान कालावधीसाठी नगराध्यक्षा पदावर संधी देण्यात आली. तर रोहिणी घुले यांच्या रिक्त होत असलेल्या उपनगराध्यक्ष पदावर आता गटनेते संतोष मेहेत्रे यांची वर्णी लागणार आहे. 

दुसऱ्या टर्ममधील उपनगराध्यक्ष पदाचे नाव नंतर सर्वानुमते ठरविण्यात येईल असा फॉर्म्युला राम शिंदे यांनी काढत तिन्ही पक्षाचा समतोल राखला असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान या फॉर्म्युल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळी जर काही नगरसेवक आमदार रोहित पवार व नामदेव राऊत गटात गेले तर इतरांना संधी कशी मिळेल असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीच्या वेळी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आता जशी परिस्थिती निर्माण झाली तशीच झाली तर इच्छकांनी काय करायचे असा सवाल कार्यकर्त्षांमधून उपस्थित केला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post