नगराध्यक्षा बदलण्यासाठी कायदाच बदलला ...

कर्जत : एक नगराध्यक्षा बदलण्यासाठी राज्याच्या सभापतीला कायदा बदलून अध्यादेश काढावा लागला यातच आमचा विजय आहे. उद्या अविश्वास ठरावात काय होईल माहीत नाही. पण राऊत कुटुंबियांनी राजकारणात फक्त सर्वसामान्य लोकांच हित पाहिलं. तर सभापती राम शिंदे यांनी आजमितीस फक्त विध्वंसक कामच केले असून त्यांनी विकासक असे काहीच केले नाही असा घणाघात नगरसेवक नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. 


यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, राहुल नेटके, ज्ञानदेव लष्कर, नामदेव थोरात आदी उपस्थित होते.

नामदेव राऊत म्हणाले की, कर्जत नगरपंचायतीच्या माध्यमातून आजतागायत सर्वसामान्य कर्जतकर समोर ठेवूनच विकासाचे काम केले. मात्र काही लोकप्रतिनिधीना आपले प्रस्थ खुपत होते म्हणून केवळ कर्जत नगरपंचायतीसाठी राज्य सरकारने नवा अध्यादेश काढावा लागला यातच आपली राजकीय प्रतिमा दिसते. 

सत्ता येते जाते. पण विकासकामेच त्या राजकीय पदाधिकाऱ्याची ओळख ठरते. त्यामुळे जे उपनगराध्यक्ष राहिले त्यांनी जनतेसाठी काय केले ? एकदा समोरा-समोर करावेच असे खुले आव्हान घुले बंधूंना दिले. राजकारण होत असते पण ज्यांच्या पडत्या काळात त्यांच्या विजयासाठी हातभार लावला त्या नगरसेवकांनी साथ सोडली याचे दुःख निश्चित आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करण्याची राऊत कुटुंबीयांची परंपरा आहे. असे नामदेव राऊत म्हणाले.

नगराध्यक्षा उषा राऊत म्हणाले की, आमदार रोहित पवारांनी विश्वास टाकत नगराध्यक्षा पदावर विराजमान केले होते. त्यास निश्चित न्याय दिला. आपल्या कार्यकाळात व्यापारी संकुल, कर्जत नगरपंचायत कार्यालय प्रशासकीय इमारत, सुरळीत पाणीपुरवठा यासाठी काम केले. 

कर्जत लाईटच्या झगमगाटाने उजळून टाकले याचे समाधान आहे. मी कधीच खुर्चीसाठी काम केले नाही. जे कार्य केले ते लोकहीत समोर ठेवूनच केले. या कठीण काळात ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानताना नगराध्यक्षा उषा राऊत भावूक झाल्या होत्या.  

२३ मार्च रोजी अमृत काळदाते हेच आमच्या गटाचे गटनेते असून उपगटनेते नगरसेविका प्रतिभा भैलुमे आहेत. त्यामुळे संतोष मेहेत्रे यांना आम्हाला व्हीप बजाविण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पक्ष ठरवतो तोच गटनेता ठरतो. 

२६ मार्च रोजी संतोष मेहेत्रे यांना गटनेत्या पदापासून मुक्त करण्यात आले. रात्री उशिरा आमदार रोहित पवारांशी चर्चा करून राजीनामा जिल्हाधिकाऱ्याकडे सोपवायचा ? की अविश्वास ठरावास सामोरे जायचे याचा निर्णय घेण्यात येईल असे नामदेव राऊत यांनी स्पष्ट केले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post