अजित पवार अन् शरद पवार एकत्र येणार...


अहिल्यानगर : कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे, ही शिकवण आपली भारतीय संस्कृती देते. पवार कुटुंब एकच आहे. काही मतभेद असतील. मात्र, एकत्र येण्याचा निर्णय अजित पवार यांच्यासह शरद पवार यांनी एकत्रपणे घेतला पाहिजे. या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुप्रिया सुळेच मध्यस्थी करू शकतात, असे सूचक विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.


पवार कुटुंब भविष्यात एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांना केला असता ते म्हणाले, पवार कुटुंब एकच आहे. थोडेफार मतभेद असतील, तर ते मिटावेत. पवार कुटुंबांने अधिक ताकदीने एकत्र आले पाहिजे, अशी व्यक्तिगत इच्छा आहे. 

मात्र, राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला, तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि दुसऱ्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे.

या गोष्टीत कोणी मध्यस्थी करू शकत असेल, तर त्या म्हणजे सुप्रिया सुळे आहेत. या तिघांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत काय निर्णय होईल, यावर आज तरी भाष्य करता येणार नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post