अहिल्यानगर : टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेंतर्गत विविध विमा पॉलिसींच्या विक्रीसाठी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर येथे थेट मुलाखतीद्वारे विमा प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी ८ व ९ मे २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत वरिष्ठ अधीक्षक डाकघर कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन डाकघरच्या वरिष्ठ अधीक्षकांनी केले आहे.
विमा प्रतिनिधी म्हणून बेरोजगार तरुण, तरुणी, स्वयंरोजगार असणारे महिला व पुरुष, सेवानिवृत्त कर्मचारी, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी, अंगणवाडी कर्मचारी, महिला मंडळ कर्मचारी, स्वयंसेवी संघटना चालक, माजी सैनिक अथवा पात्रता धारक उमेदवार अर्ज करु शकतात.
उमेदवाराचे वय १८ वर्षे पूर्ण असावे व १० पास असावा. उमेदवारास विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती असणे आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आयआरडीए ची ऑनलाईन परीक्षा पास करावी लागेल. तसेच पाच हजार रुपयांचे टपाल बचत खात्यामध्ये राष्ट्रीय बचतपत्र, किसान विकासपत्रामध्ये तारण म्हणून ठेवावे लागेल. विमा प्रतिनिधी म्हणून निवड केलेल्या उमेदवारांना टपाल विभागाने ठरवून दिल्याप्रमाणे कमिशन दिले जाईल.
उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर यांच्या नावाने केलेला लेखी अर्ज, शैक्षणिक पात्रतेची आवश्यक मुळ प्रमाणपत्रे व छायाकिंत प्रती, आधारकार्ड, छायाचित्रासह इतर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित रहावे, असेही कळविण्यात आले आहे.
Post a Comment