कर्जत : कर्जत नगरपंचायतच्या सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या विरोधात बंड केलेला आहे. त्यांच्या विरोधात एकदा नव्हे तर दोनदा अविश्वास ठराव दाखल केलेला आहे. यामुळे कर्जतमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी भाजपच्या दोन नगरसेवकांना समवेत घेत अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यासाठी सोमवार (ता. २१) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नवीन तरतुदी नुसार जर हा अविश्वास ठराव संमत झाला, तर तो राज्यातील पहिला ठरणार होता.परंतु या बैठकीपूर्वीच राऊत यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राजकीय समीकरणे सगळी बदलली आहे.
येथील नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता आहे.
मात्र नगरपंचायतीमधील सत्ताधारी गटनेते संतोष म्हेत्रे यांनी स्वपक्षाच्या आठ व काँग्रेसच्या उपनगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्यासह इतर दोन नगरसेवकांना बरोबर घेत राऊत यांच्या विरोधात बंड केले होते. आज अविश्वास ठरावार बैठकीत निर्णय होणार होता. परंतु
अविश्वास ठरावापूर्वीच नगराध्यक्षा उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे राऊत यांनी सुपूर्द केला आहे.
यामुळे राजकारणाने आता वेगळे वळण घेतले आहे. आता कर्जतचे नगराध्यक्ष कोन होणार याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
Post a Comment